About Summer Camp 2019

निसर्गमित्र पनवेल आयोजित, डोंगराच्या कुशीत उन्हाळी शिबीर

पाली हे सुधागड तालुक्यातील वैशिष्ट्य पूर्ण गाव आहे. पालीचा परिसर सरसगड, सुधागड असे किल्ले, ठाणाळे लेणी, उन्हेरे गरम पाण्याची कुंडे, पाच्छापूर सारखे गाव व पालीचा गणपती ,*रामेश्वर* व उध्दर सारखी देवस्थाने यांनी समृद्ध आहे. रामेश्वर ला प्राचीन मंदिर तर आहेच पण येथे देवराई आहे - देवराई म्हणजे देवाच्या साठी राखलेले रान.

तर यंदाचा समर कॅम्प आहे तो या देवराईत. डोंगरावर वसलेल्या या रामेश्वरच्या देवराईत उध्दर मधून जाता येत. या देवराईत नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे. या स्रोताला धक्का न लावता, त्याच्या आधारे एखादी वस्ती कशी जगू शकते ते पाहण्यासारखं आहे. रामेश्वरची ही वस्ती डोंगरावर आहे. दुर्गम असली, छोटी असली तरी स्वच्छ आहे. विशेष म्हणजे या लोकांमध्ये माणुसकी आहे. या देवराईचा परिसर अनेक मोठ्या वृक्षांनी वेढलेला असला तरी सीता अशोक या वृक्षाची इथे मुबलकता आहे. अशा वैशिट्यपूर्ण देवराईत मुलांना आपण घेवून जातोय निसर्गाशी नात जोडायला.

Like Shantiniketan, all sessions will be taken under trees. It creates a feeling in children that they are an integral part of nature.

मुलांना असं feeling आलं की मग आपोआप ही मुलं निसर्ग व पर्यावरण या विषयी सजग बनतात. संवेदनशील बनून पुढे भावी आयुष्यात निसर्गातील प्रत्येक घटकाची काळजी घेतात.

चला तर मुलांना निसर्गाच्या जवळ जायची, त्यांना सजग बनवायची एक संधी देऊ या

ठिकाण - रामेश्वर देवराई

वयोगट - ८ ते १५ वर्षे

कालावधी- 18 ते 21 एप्रिल 2019

फी - ₹ २०००/-

शिबिरातील उपक्रम -


ओरिगामी,
जंगल भ्रमंती
कॅम्पिंग-एक रात्र उघड्या आभाळा खाली,
लगोरी, खो-खो, रस्सी खेच असे पारंपरिक खेळ.
सर्प ज्ञान
आकाशदर्शन (स्टार गेझिंग)
द-दुर्गाचा- गड किल्ल्यांवरील वास्तू व अवशेष यांचे ज्ञान
पेपर क्राफ्ट
नाईट ट्रेक,
टेंट पिचिंग,
टीम बिल्डिंग खेळ
नेचर ट्रेल्स,
Adventure films/documentaries,

सोबत घ्यावयाच्या वस्तू :-

1) हॅवर सॅक
2) छोटी सॅक(Pittu)- शेवटच्या दिवसाच्या ट्रेक साठी- पाण्याच्या 2 बाटल्या, थोडा खाऊ, टोपी आणि नॅपकिन मावेल एवढीच लहान असावी
3) जेवणा साठी ताट,(वरण भात भाजी मावेल एवढे ताट असावे), वाटी, ग्लास/मग, चमचा.
यातील काहीही Use n Throw नसावे.
4) पाण्याच्या बाटल्या- 1 Ltr×2
5) टोपी
6) टॉवेल व नॅपकिन
7) स्लीपिंग बॅग किंवा हलके अंथरूण पांघरूण
8) पुरेसे कपडे
9) सॉक्स -निदान 2 जोड
10) Shoes with Lace
11) स्लीपर्स किंवा फ्लोटर्स
12) टूथब्रश *(टूथ पेस्ट पुरवली जाईल)*
13) टॉर्च + Extra Cells
14) बाथ सोप
15) आवडीचा सुका खाऊ(avoid packaged food like Lays to minimize litter), शक्यतो सुका खाऊ एखाद्या डब्यात द्यावा, जेणे करून कचरा कमी होईल. व हा डबा ट्रेकच्या वेळी पॅक लंच देण्यासाठी वापरता येईल.
16) Writing /Exam पॅड
17), पेंटिंग ब्रश (0 ते 6 No. चे, जे घरी असतील ते)
18), रंग mix करायला pallet.
19), छोटी Craft ची कातरी.
20), अंघोळीसाठी कपडे (उथळ नदीत डुंबायचे आहे)

नावनोंदणी व अधिक माहिती साठी संपर्क :-

त्रिवेणी पाटील :- ९६६५१०९१६८
अरविंद गोडबोले :- ८०९७६३५२३३
Triveni Patil
9665109168
Arvind Godbole
8097635233

Events

No images or videos available..

Contact Us


Nisargamitra
Panvel 410206

You can subscribe our news letters by sending email to us.

Copyright © 2015 Nisargamitra. Design by SkyQ Infotech