About Summer Camp 2018

निसर्गमित्र पनवेल आयोजित, डोंगराच्या कुशीत उन्हाळी शिबीर

गेली ३२ वर्ष मुलांना डोंगरात घेऊन जात असलेल्या अनुभवी संस्थेचा "मुलांसाठीचा समर कॅम्प"......
मुलांचं बालपण आपण पूर्णपणे हरवून टाकलंय. त्यांनी खेळावयाचे खेळ विसरत चाललोय.
मुलांचे खेळ त्यांना सहकार्य व साहचर्य शिकवत असतात, अनेक खेळ मुलांना झगडायला, वारंवार प्रयत्न करायला शिकवतात.
हरवलेल्या बालपणाची व विसरलेल्या खेळांची मुलांना परत ओळख व्हावी, त्यांना बालपणाच्या छान आठवणीत जपण्यासाठी एखादी छान गोष्ट दयावी म्हणून हा Summer Camp.
हा Summer Camp असेल तो माथेरानच्या पायथ्याशी - डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावात. तिथल्याच शाळेत मुलं राहतील व परिसरात धमाल करतील.
हा कॅम्प मुलांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाणार असेलच शिवाय त्यात निसर्गाकडे व जीवनाकडे पाहण्याचा सुंदर दृष्टिकोन द्यायचा प्रयत्न केला जाईल.

ठिकाण - पिरकरवाडी (माथेरानच्या पायथ्याशी)

वयोगट - ८ ते १५ वर्षे

कालावधी- 3 ते 6 मे 2018

फी - ₹ १८००

शिबिरातील उपक्रम -


* लगोरी, आबाधुबी, कांदा-फोडी व विषामृत असे पारंपारिक खेळ
*चमत्कार कि विज्ञान
*Life skills
*निसर्गातील गमती जमती
*पक्षी निरीक्षण
*आकाश निरीक्षण
*इंद्रधनुष्य-रंगांची दुनिया
*ओरिगामी
*Night jungle Trek
*"एक रात्र मळ्यावरील खळ्यात"
*आजीच्या गोष्टी
*Off road Cycling
*ट्रेक टू माथेरान*- via शिवाजी लॅडर

सोबत घ्यावयाच्या वस्तू :-

1) हॅवर सॅक
2) छोटी सॅक(Pittu)- शेवटच्या दिवसाच्या ट्रेक साठी- पाण्याच्या 2 बाटल्या, थोडा खाऊ, टोपी आणि नॅपकिन मावेल एवढीच लहान असावी
3) जेवणा साठी ताट,(वरण भात भाजी मावेल एवढे ताट असावे), वाटी, ग्लास/मग, चमचा.
यातील काहीही Use n Throw नसावे.
4) पाण्याच्या बाटल्या- 1 Ltr×2
5) टोपी
6) टॉवेल व नॅपकिन
7) स्लीपिंग बॅग किंवा हलके अंथरूण पांघरूण
8) पुरेसे कपडे
9) सॉक्स -निदान 2 जोड
10) Shoes with Lace
11) स्लीपर्स किंवा फ्लोटर्स
12) टूथब्रश *(टूथ पेस्ट पुरवली जाईल)*
13) टॉर्च + Extra Cells
14) बाथ सोप
15) आवडीचा सुका खाऊ(avoid packaged food like Lays to minimize litter), शक्यतो सुका खाऊ एखाद्या डब्यात द्यावा, जेणे करून कचरा कमी होईल. व हा डबा ट्रेकच्या वेळी पॅक लंच देण्यासाठी वापरता येईल.
16) Writing /Exam पॅड
17), पेंटिंग ब्रश (0 ते 6 No. चे, जे घरी असतील ते)
18), रंग mix करायला pallet.
19), छोटी Craft ची कातरी.
20), अंघोळीसाठी कपडे (उथळ नदीत डुंबायचे आहे)

नावनोंदणी व अधिक माहिती साठी संपर्क :-

राजन तारे - 9930112221
शिल्पा जाधव - 9833535293
धनंजय मदन - 8369597470
Rajan Tare
9930112221
Shilpa Jadhav
9833535293

Events

No images or videos available..

Contact Us


Nisargamitra
Panvel 410206

You can subscribe our news letters by sending email to us.

Copyright © 2015 Nisargamitra. Design by SkyQ Infotech