About Art in Nature

निसर्ग कला अर्थात आर्ट इन नेचर
अर्थ आर्ट,एनवोरमेंटल आर्ट,साईट स्पेसिफिक आर्ट इत्यादि नाव असणारा कलेच्या वेगवेगळ्या प्रकारांपैकी हा एक प्रकार आहे.
ज्या मध्ये निसर्गात जाऊन निसर्गाच्या घटकांपासून म्हणजे पान, फुलं, काट्या,पाणी,दगड, वाळू इत्यादी पासून कलाकृती साकारणंं ;ज्या मधून निसर्गाचे सौन्दर्य, त्याची भव्यता,मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या समस्या व्यक्त करणं हा उद्देश आहे.
निसर्ग सुंदर अाहे. निसर्ग म्हणजे भले मोठे एक चित्रच जणू! या अवाढव्य चित्रातही असंख्य छोट्या छोट्या "चित्र चौकटी" असतात, या कधी आपल्याला दिसतात तर कधी त्यातून आभास निर्माण होतात.
या छोट्या छोट्या चौकटीत आपापल्या परीने सुधारणा केली तर अधिक सुंदर दृश्य तयार होतात.
निसर्ग आपल्याला भरभरून देत असतोच, आपल्या कुंचल्याने, कल्पना शक्तीने निसर्गाला काही देणे याही दृष्टीने या कडे पाहता येईल.
इतर वेळेस आपण निसर्गामध्ये फिरायला जातो त्यावेळेस आपण आपल्या परीने त्याचा अनुभव घेतो परंतु जर आपल्यामध्ये निसर्गातील घटकांपासून कला निर्मिती करण्याचा दृष्टिकोन तयार करू शकलो तर निसर्गाला अनुभवण्याचा वेगळा पैलू आपल्याला उमजेल ,आपला त्या बद्दलचा आदर वृद्धिंगत होऊन आपल्याही निर्माण करण्याच्या आणि सृजन करण्याच्या क्षमतेत भर पडेल.
ही कल्पना सत्यात आणण्यासाठी रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गाढेश्वर मंदिरामध्ये एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली आहे.

मार्गदर्शक तज्ज्ञ - संदीप मोरे

जमण्याचे ठिकाण - गाढेश्वर मंदिर सकाळी ९.०० वाजता

लागणारे साहित्य - (गटामध्ये)
> एक दोऱ्याची गुंडी,
> कैची,
> कटर,
> फेविकॉल ची छोटी ट्यूब,
> एक छोटी ज्यूट ची रस्सी ची गुंडी,

प्रत्येकाने आणावे
> टोपी,
> नॅपकीन/रूमाल,
> पाण्याची बाटली,
> एक वेळेचा जेवणाचा डबा,
> चहासाठी कप.
> खाली बसून काम करण्याजोगे कपडे असावेत.

प्रवेश फी - ५० रुपये

नांव नोंदणी
9970051489 किशोर म्हात्रे
9987290759 धनंजय मदन
धनंजय मदन
8369597470
किशोर म्हात्रे
9970051489

Events

Contact Us


Nisargamitra
Panvel 410206

You can subscribe our news letters by sending email to us.

Copyright © 2015 Nisargamitra. Design by SkyQ Infotech